#GeetaJayanti, #VaikuntaEkadashi, #GitaJayanti, #GitaJayanti2020, #vaikuntaekadasi2020
गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ असला तरी यात काय आहे याची माहिती आपल्यापैकी बरेच जणांना नसते. महाभारत युद्धाच्या सुरुवातीला समोर सगे सोयरे, आप्त बंधू यांना रणमैदानात पाहिल्यावर अर्जुन भ्रमित झाला, त्याला हे युद्धच नको असे वाटू लागले व त्याला समजावून युद्धाला तयार करण्यासाठी श्रीकृष्णांनी जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे भगवतगीता. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल एकादशीला हि सांगितली गेली असे मानून हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वैकुंठाची दारे उघडी असतात व या दिवशी मृत्यू आल्यास मोक्षप्राप्ती होते असे मानून या दिवसाला वैकुंठ एकादशी अथवा मोक्षदा एकादशी असेही म्हटले जाते. एकूण १८ अध्यायाच्या ७०० संस्कृत श्लोकांमध्ये गीता सांगितली गेली आहे.
अध्याय पहिला : अर्जुन विषाद योग - या अध्यायात अर्जुनाला आपले आप्त स्वकीय समोर पाहून त्यांच्याशी युद्ध करायचे याबद्दल वाटणाऱ्या विषादाचे वर्णन आहे.
अध्याय दुसरा : सांख्य योग
अध्याय तिसरा - कर्म योग
अध्याय चवथा - ज्ञानकर्म सन्यास योग
अध्याय पाचवा - सन्यास योग
अध्याय सहावा - ध्यान योग
अध्याय सातवा - ज्ञान विज्ञान योग
अध्याय आठवा - अक्षरब्रम्ह योग
अध्याय नववा - राजविद्या राजगुह्य योग
अध्याय दहावा - विभूती योग
अध्याय अकरावा - विश्वरूप दर्शन योग - याअध्यायात भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप दर्शन करवले आहे.स्तिमित झालेला अर्जुन मग भगवंतांना त्यांच्या मूळ रूपात येण्याची विनंती करतो
अध्याय बारावा - भक्ती योग - या अध्यायात भगवंतांनी आपल्याला कोणत्या प्रकारचे भक्त प्रिय ते स्पष्ट केले आहे व त्यानुसार अर्जुनाने कसे वागले पाहिजे हे सांगितले आहे
अध्याय तेरावा - क्षेत्र क्षेत्रज्ञविभाग योग
अध्याय चौदावा - गुणत्रय विभाग योग
अध्याय पंधरावा - पुरुषोत्तम योग
अध्याय सोळावा - दैवासुरसंपद विभाग योग
अध्याय सतरावा - श्रद्धात्रय विभाग योग
अध्याय अठरावा - मोक्ष सन्यास योग
No comments:
Post a Comment