कृष्णार्जुनानी केलेले खांडव वनाचे दहन हि महाभारतातील एक उल्लेखनीय घटना असल्याचे मानावे लागते कारण वरवर अनेक घटनांपैकी एक असे वाटणारी हि घटना पांडवांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करणारी एक घटना ठरली
एका ब्राह्मणाच्या रूपात आलेल्या अग्नीला दिलेले वाचन पूर्ण करण्याकरिता म्हणून कृष्णार्जुनांनी खांडव वन जाळल्याचा उल्लेख महाभारतात येतो. पण केवळ हे वन जाळूनच ते स्वस्थ बसले नाहीत तर या वनात वास करणाऱ्या व या अग्नीच्या ज्वालांतून स्वतःला सोडवू पाहणाऱ्या नाग जमातीच्या लोकांचा त्यांनी संहार केला व याला काहीतरी विशिष्ट कारण असले पाहिजे. या आधीही हे वन जाळण्याचे प्रयत्न अग्नीने केले होते नाग प्रमुख तक्षकाचा मित्र असलेल्या इंद्राने आपल्या पर्जन्य वर्षावाने ते हणून पडले होते. यावेळी मात्र प्रत्यक्ष कृष्णार्जुनच युद्धात उतरल्याने इंद्राचे काही चालले नाही व खांडव वन अग्नीच्या भक्षस्थानी पडले तेदेखील आता प्राणी व नाग जमातीच्या लोकांसह.
या अग्निसंहाराच्या वेळी खांडव वनातील नागांचा प्रमुख तक्षक वनात नव्हता म्हणून तो वाचला. त्याची बायको व काही मुलं मात्र यात मृत्युमुखी पडली व म्हणूनच नाग पांडवांचे वैरी झाले, पुढे महाभारत युद्धात पांडवांचा सूड घेण्यासाठी सर्व नाग जमाती कौरवांच्या बाजूने लढल्या.अर्जुनासाठी तर पुढे हे वैर अभिमन्यूचा मुलगा परीक्षित याचा सर्पविषाने मृत्यू घडवून आणेपर्यंत गेलं. परीक्षिताचा मुलगा जनमेजय याने मग नागांच्या नाशासाठी याज्ञ देखील केला.या सर्वांवरून या प्रसंगाची दाहकता पुढच्या पिढ्यांपर्यंत कशी पसरत गेली हेआपल्या लक्षात येईल.
याचअग्निसंहारातून तक्षकाच्या घरी आश्रयास असलेला मय हा असुर शिल्पी बाहेर पडला.कृष्णार्जुनांनी त्याला जीवदान दिले व या उपकारांची परतफेड म्हणून त्याने पांडवांना इंद्रप्रस्थात भव्य मयसभा नावाचं भव्य सभागृह बांधून दिले
No comments:
Post a Comment